कोरेगाव भीमा प्रकरण ; चौकशीला मुख्यमंत्री असो नाहीतर कुणीही असो चौकशीला यावंच लागेल

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा प्रकरणात चौकशीला आवश्यक असल्यास संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं जाईल. मग त्यात ती व्यक्ती मुख्यमंत्री असो वा आमदार, त्या मान्यवराला योग्यवेळी चौकशीसाठी आयोगासमोर बोलावलं जाईल, असं भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाचे प्रमुख माजी न्यायमूर्ती पटेल यांनी सांगितलं.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाला एक अर्ज दिला होता. या अर्जात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोगासमोर साक्षीसाठी बोलवावं, अशी मागणी लाखे-पाटील यांनी आयोगापुढे केली. तसेच, पोलीस रेकॉर्ड, वायरलेस रेकॉर्ड, जखमी पोलीस यांना साक्षीसाठी बोलावावे.

Loading...

त्याचप्रमाणे वायरलेसवर तेव्हाच्या मुख्यमंत्री यांच्यासोबत काय बोलणं झालं, हे देखील आयोगासमोर सादर करण्याचे आदेश द्यावेत. तेव्हाचे पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या हिंसाचारात जखमी झाले होते. त्यांनाही बोलावण्यात यावं, अशी मागणी लाखे पाटील यांचे वकील बी.ए. देसाई यांनी आयोगाला केली.

कोरेगाव भीमाप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणीकरणी आज चौकशी आयोगासमोर रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांची साक्ष झाली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'