कोरेगाव भीमा प्रकरण षडयंत्र! सतर्क राहा! ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra CM Devendra Fadnavis

मुंबई : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेली दंगल हे एक मोठ हे मोठं षडयंत्र होतं. येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे सतर्क राहा आसा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठकित व्यक्त केले. तसेच अशावेळी सर्वांना तिरंग्याखाली एकत्र आणून, भाजप कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला दिला.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरेगाव भीमा हे फार मोठ षडयंत्र होतं. राज्यात येणाऱ्या काळात जातीयवादी तेढ निर्माण करणाऱ्या परस्थिती उद्भवू शकतात. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे. लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. जातीय तेढ निर्माण झाल्यास भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा झेंड्या खाली सर्वाना सोबत आणावं. भाजप आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी वर लक्ष द्यावे. लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. निवडणुकीच्या तयारीला लागा. असं मुख्यमंत्री म्हणाले.Loading…
Loading...