fbpx

सरकारकडे संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही- आंबेडकर

prakash aambedkar

टीम महाराष्ट्र देशा- माणूस कुठल्याही विचारांचा असेल तरी त्याला अटक झाली पाहिजे. संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी केला आहे.मुंबईत बॅलार्ड पिअरला पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर हल्ला चढवला. भिडे यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्याना तो इशारा गेलाय का ? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकाविल्याच्या आरोपात मिलिंद एकबोटेला अटक झाली पण संभाजी भिडे यांना अजूनही अटक झाली नसल्याचं समाजाला पचत नाही .कोरेगाव भीमामधील दंगल ही घडवलेली दंगल होती.ज्यावेळी गुन्हा दाखल होतो,चार्जशीट दाखल होते,त्या माणसाला चौकशीला बोलावणे बंधनकारक असते . पण त्या व्यक्तीला चौकशीला बोलावले नाही.माणूस कुठल्याही विचारांचा असेल तरी त्याला अटक झाली पाहिजे. त्यांना अटक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही, भिडे यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्याना तो इशारा गेलाय का ?

दरम्यान, कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे. काल एकबोटेला शिवाजीनगर न्यायालयमध्ये हजर करण्यात आल असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आलेली आहे. दंगल भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी न्यायालयात हजर करण्यात आल असता एकबोटेवर शाई फेकण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता.

2 Comments

Click here to post a comment