मसाजच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट, पुणे पोलिसांकडून परराज्यातील मुलींची सुटका

Sex-Racket aurangabad

टीम महाराष्ट्र देशा: मेट्रो सिटी म्हणून नावारुपला आलेल्या पुणे शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे प्रमाण वाढले आहे, तसेच शहरातील अनेक भागांमध्ये समाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. कोरगाव पार्क पोलिसांनी अशाच एका मसाज सेंटरवर धाड टाकत परराज्यातील मुलींची सुटका केली आहे.

कोरेगाव पार्क येथील लिबर्टी सोसायटीमध्ये चालणाऱ्या ओशनिक स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मिळालेल्या माहितीनुसार खातरजमा केली असता स्पाचा मॅनेजर के हिग्बा सायमन ( रा. मुंढवा, मूळ गाव. गरम मशाक सगई, मणिपूर ) हा राज्यातील व परराज्यातील चार ते पाच मुलींकडून पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाले. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिसांनी स्पा मॅनेजर आणि मालक धनराजच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुटका करण्यात आलेल्या मुली या गरीब घरातील असून त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. सुटका करण्यात आलेल्या पिडीत मुलींना हडपसर येथील रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आल आहे. सदरची कारवाई कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांच्या पथकाने केली आहे.