कोपर्डी निकाल: फाशी की जन्मठेप..? काउंटडाऊन सुरु…

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात

टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीनही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. दोषींना शिक्षेवर काल जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला. आज अखेर पिडीतेच्या कुटुंबियासाठी न्यायाचा दिवस आहे. अगदी थोड्याच वेळात तीनही दोषी आरोपींवर शिक्षा सुनावली जाणार आहे.

balasaheb pokale

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील मोठी खबरदारी घेतली आहे. निकाल अति महत्वाचा असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न्यायालय परिसर, नगर शहरामध्ये घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचबोरबर कोपर्डी गावामध्ये देखील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एसआरपीएफ. दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बॉंब शोधक आणि नाशक पथकांकडून देखील न्यायलय परिसराची तपासणी करण्यात आली आहे. आता या निकालाकडे अवघ्या राज्याच लक्ष लागल आहे