कोपर्डीतील तिन्ही नराधमांवर आरोप सिद्ध; २२ तारखेला होणार फैसला

अहमदनगर: कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी नक्की काय निकाल येणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. आज या प्रकरणातील तिन्ही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला आहे.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे.

तीनही आरोपींवर आता येत्या २२ तारखेला शिक्षेची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता २२ नोव्हेंबरला होणार आहे.

You might also like
Comments
Loading...