fbpx

कोपर्डीच्या नराधमांचा फैसला २९ नोव्हेंबरला… दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण

अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणाचा आज महत्वपूर्ण निकाल येण्याची शक्यता होती पण अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने कोपर्डी खटल्याचा निकाल २९ नोव्हेंबरला येणार असल्याच सांगितल आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला हा निकाल आता २९ नोव्हेंबरला येणार आहे.

दरम्यान, सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद आज जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यात त्यांनी आरोपींनी आदल्या दिवशी पिडीतेला अडवलं, एकाने तिला ओढलं आणि दोघे हसत त्यांनतर पिडीतेची मैत्रीण रडत होती. आरोपींनी पिडीतेला मारलंच नाही तर आनंद घेतला असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला आहे. तर दोषींना अजूनही पश्चाताप नाहीये. आरोपींना जर कमी शिक्षा झाली तर ते परत असं भयानक कृत्य करणार नाही याची खात्री काय ? असा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे. दोषींना फाशीची शिक्षा का द्यावी याची १३ कारणे उज्ज्वल निकम यांनी आज कोर्टासमोर मांडली

पहा काय म्हणाले उज्ज्वल निकम