राज्यात एकहाती सत्तेसाठी पदवीधर मतदारसंघाचा विजय महत्त्वाचा -आदित्य ठाकरे  

कुडाळ : राज्यात एकहाती सत्तेसाठी पदवीधर मतदारसंघाचा विजय महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग भगवामय बनला आहे. आम्ही भगवा व बाळासाहेबांसाठी लढलो. असे शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे झालेल्या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. या वेळी पालकमंत्री केसरकर, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, उमेदवार संजय मोरे, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, विक्रांत सावंत उपस्थित होते.

ठाणे महापौर असताना संजय मोरे यांनी उल्लेखनीय काम केले म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी मोरे यांना उमेदवारी दिली आहे. पदवीधर उमेदवार शिक्षकांचे प्रश्न घेऊन युवा सेनेचा लढा सुरू आहे. असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हंटले. मागील दोन महिन्यांत युवा सेनेचे सिनेटमध्ये जे काम केले ते इतरांनी करून दाखवावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. गावपातळीवर पदवीधरांच्या प्रश्नावर शिवसेना कायमच अग्रभागी असेल शिक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी २५ जूनच्या विजयानंतर पुन्हा सिंधुदुर्गात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

You might also like
Comments
Loading...