मुंबई : मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि मा. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरला नसल्याची घनघाती टीका योगेश खैरे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली. यावरून माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेला चांगलंच सुनावल आहे.
“कोणी एैरा, गैरा नट्टू खैरा पत्र लिहतो, त्याची आम्ही दखल घेत नसल्याचं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यावेळी म्हणाल्या. लोकशाहीत पत्र लिहण्याचा अधिकार आहे, तेवढ्याचं हिशोबात राहावं. उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचण्याची तुमची लायकी नाही. स्वत:चा पक्ष कसा वाढेल, यावरती लक्ष द्या. तमाम माझ्या हिंदूंनो-भगीनींनो म्हणण्याचा अधिकार सर्वांना आहे,” असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असल्याचा आरोप मनसेकडून वारंवार केला जात आहे. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसत आहेत. मात्र मनसे आणि भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टीका करण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच माणसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं. यावरून किशोरी पेडणेकर यांनी मनसेला सुनावलं आहे.
काय म्हणालेत योगेश खैरे?
उद्धवजी उद्या शिवतीर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना आणि भगिनींनो म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तरे द्या.
मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या मा.बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षाशी युती का केली?
PFI सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात?
एमआयएम सपा सारख्या पक्षांसोबत दोन-चार मतांसाठी हात मिळवणे का केली?
सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण का रोखले नाही?
मस्जिदवरील भुंगे उतरले पाहिजेत हा मा.बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले?
मा.बाळासाहेब यांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात?
अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केली?
आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हे कसं सुचलं? असे प्रश्न मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी उद्धव ठाकरे यांना एका पोस्टच्या माध्यमातून विचारले आहेत. शेवटी ते लिहितात की, “सहाजिकच या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार त्यामुळे माझ्या जन्मलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि मा.बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही” अशी घनाघाती टीका योगेश खैरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Cabinet meeting । शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातील ७ कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट पॅकेज जाहीर
- Viral Video | सायकलवर बसून केले शास्त्रीय नृत्य, मुलीचा डान्स बघून व्हाल थक्क!
- Supriya Sule | “सत्याचा अखेर विजय झाला आहे”; देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde | दसरा मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिकांसाठी शिंदे गटाने दिली ‘इतके’ लाख फूड पॅकेट्सची ऑर्डर
- Anil Deshmukh | अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण तुरुंगातून सुटका नाही! जाणून घ्या काय आहे प्रकरण?