कोलकाताच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्लीच्या संघाला विलगीकरणात जाण्याचे आदेश

आहमदाबाद : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले. सोमवारी ३ मे रोजी आयपीएलमध्ये काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे केकेआर आणि आरसीबी संघादरम्यानचा सामना पुढे ढकलण्यात आला. मात्र यादरम्यान दिल्लीच्या संघाने ४ दिवस आधी केकेआरविरुद्ध एक सामना खेळला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीच्या खेळाडूंना विलगीकरणात जाण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मात्र दिल्लीच्या विलगीकरणाचा कालावधी किती असणार हे स्पष्ट झालेले नाही. पण ४ तारखेला दिल्ली संघाचे सराव सत्र रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे दिल्ली कॅपीटल्सचा पुढील सामना ८ मे रोजी कोलकाता नाइट रायडर्स संघासोबतच आहे. सोमवारी सकाळी केकेआरचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन खेळाडू तर दुपारी सीएलकेचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

महत्वाच्या बातम्या