‘कोल्हापूरचा विकास माझ्यासाठी राजकारण करण्याचा मुद्दा नाही’

टीम महाराष्ट्र देश – कोल्हापूरचा विकास माझ्यासाठी राजकारण करण्याचा मुद्दा नाही, ती माझी जबाबदारी आहे. माझ्या पूर्वजांनी या परिसरासाठी खूप काही केलंय. त्यांच्या एवढं मी काही करू शकेन असं नाही पण त्यांनी मागे ठेवलेल्या वारशाला जपून ठेवत पुढे घेऊन जाणं माझ्यासाठी मोठं आव्हान आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणले.

Loading...

कोल्हापूर विमानतळाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.

यावेळी संभाजीराजे म्हणले, खासदार बनून गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जर मी कोणत्या दोन प्रश्नांना हात घातला असेल तर , एक मराठा आरक्षण आणि दुसरा कोल्हापूर विमानतळ. कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा होता. कारण हे विमानतळ माझ्या पूर्वजांनी सुरु केलं होतं.Loading…


Loading…

Loading...