कोल्हापूरकरांचा विषय हार्ड; रस्त्यावर थुंकणाऱ्या रिक्षाचालकाला घडवली ‘अशी’ अद्दल!

Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूरकर त्यांच्या नाद खुळा स्वभावाने खास प्रसिद्ध आहेत. खवय्ये, रसिक मनअसणाऱ्या कोल्हापूरकरांनी एकअनोखा उपक्रम सुरु केला आहे. ‘माझं कोल्हापूर, थुंकी मुक्त कोल्हापूर’ अभियानाला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील महाराणी ताराराणी चौकामध्ये सोशल डिस्टंसिंग पाळून फलकाद्वारे संदेश देण्यात आला.

कोल्हापूरकर जसे स्वभावाने प्रेमळ असतात तसेच ते कडक आणि निर्भीड असतात, याचाच प्रत्यय या अभियानाच्या पहिल्याच दिवशी आला आहे.  ” एक दिल एक जान,देऊ स्वच्छतेकडे ध्यान, एक पिचकारी आयुष्याचा नाश करी,” असे बॅनर- पोस्टर यावेळी वापरून अँटी स्पिट मोहिमेच्या जनजागृतीची सुरुवात करण्यात आली. करवीरनगरीत आज पासून सुरू होणारी ही चळवळ यापुढे शहराच्या सर्व भागात तसेच पूर्ण जिल्ह्यात राबवली जाईल, असे मोहिमेच्या प्रमुख दीपा शिपूरकर यांनी सांगितले आहे.

या मोहिमेची जनजागृती सुरु असतानाच सिग्नलवर थांबलेल्या एका रिक्षा चालकाने तोंडातुल पान थुंकून चूळ भरली. हे एका स्वयंसेवकाच्या लक्षात येताच त्यांनी त्या रिक्षा चालकाला थांबवले आणि कोल्हापुरी रांगड्या भाषेत चांगलंच समजावलं . इतकंच नाही तर स्ता स्वच्छ करण्याची विनंती देखील केले. रिक्षाचालकाला देखील आपली चूक लक्षात येताच त्याने स्वतः एक फडकं घेऊन रस्ता स्वच्छ केला. रिक्षाचालकाच्या या प्रतिसादाला या स्वयंसेवकांनी टाळ्यांची दाद दिली. नागरिकांचा मिळता पाठींबा आणि या कोरोना सारख्या रोगापासून दूर राहण्यासाठी असलेली गरज बघता या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

ज्या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले त्याच भूमीवर थुंकणे व विद्रूपीकरण करणे हे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही ‘महाराष्ट्र देशा’तर्फे सर्व नागरिकांना विनंती करतो की, सार्वजनिक आरोग्यास बाधा येईल असे कोणतेही कृत्य करू नये.

महत्वाच्या बातम्या :-