fbpx

शासकीय विश्रामगृहात भेट नाही म्हणून संभाजी भिडेंनी गाठलं थेट चंद्रकांत पाटलांचं घर

टीम महाराष्ट्र देशा : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. पण भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

चंद्रकांत पाटील कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजी भिडे काल दुपारी तिथे आले होते. मात्र पाटील यांना येण्यास उशिर झाल्याने संभाजी भिडे सांगलीला परतले. परंतु आज सकाळी सव्वादहा वाजता संभाजी भिडे सांगलीहून कोल्हापूरला आले आणि चंद्रकांत पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली.

१ जानेवारी २०१७ ला भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारात संभाजी भिडे यांचे नाव प्रखर्षाने पुढे आले होते. येत्या १ जानेवारीला देखील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठा जनसमुदाय येणार आहे. यासाठी, पुणे ग्रामीण पोलिसांनी गाव गुंडांना तडीपार करुन चांगलीच कंबर कसली आहे. येत्या १ जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

5 Comments

Click here to post a comment