कोल्हापूरकरांची चिंता वाढली; जिल्ह्यातील आणखी ८ जण पॉझिटिव्ह

corona

कोल्हापूर: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शहरांसह जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातच सुरुवातीला ऑरेंज झोन असणारा पण परिस्थिती आटोक्यात असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पैलवानांचा जिल्हा ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात आता चिंता वाढत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज सोमवारी आणखी आठ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यात कोल्हापूर शहरातील शिवाजी पार्क येथील १, ताराबाई पार्क ३, उचगाव १ तर जिल्ह्यातील धामोड (ता. राधानगरी) येथील १ आणि कबनूर (इचलकरंजी) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर एक रुग्ण वाळवा (सांगली) येथील आहे. हे आकडे पुढारी वृत्तपत्रानुसार आहेत.

गेहलोत सरकारवरील संकट महाराष्ट्रातील ‘हा’ धुरंधर नेता करणार दूर, राजस्थानाकडे रवाना होण्याची सूचना

तर, रविवारी ६४ रुग्ण आढळून आले होते. त्यातील १९ जण कोल्हापुरातील, तर १९ जण इचलकरंजी शहरातील आहेत. यामुळे कोल्हापूर शहरातील बाधितांची संख्या शंभरावर गेली आहे. टिंबर मार्केट, राजाराम चौकातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. एका महिला डॉक्टरचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील दहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामुळे आता, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या बाराशेच्या वर पोहोचली आहे. तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या २५ झाली आहे. कोल्हापूर शहरात धोका वाढला आहे. प्रारंभी उपनगरांत रुग्ण आढळून येत होते, आता शहराच्या मध्यवर्ती, उच्चभ्रू परिसरातही रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

#corona: चिंता वाढली; भारतात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद