पाकड्यांचा शेपूट वाकडचं, कोल्हापूरचे जवान संग्राम पाटील धारातीर्थी

sangram patil

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला. जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात 16 मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना वीरमरण आलं. गेल्याच आठवड्यात जवान ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते.

संग्राम पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील निगवे खालसा या गावातील रहिवासी होते. जम्मू-काश्मीरमधील राजोरी भागात सोळा मराठा पोस्टवर पाकिस्तानने भ्याड हल्ला केला त्यामध्ये संग्राम पाटील यांना वीरमरण आलं. शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऐन दिवाळीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावातील जवान ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आलं होतं त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच दुःख सावरत न सावरत तोच हा दुसरा धक्का बसला आहे. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांनी देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली. पाकिस्तानने 13 नोव्हेंबरला शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला.

महत्वाच्या बातम्या