कोल्हापूर : महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आघाडीकडे

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळवता आल्या नाहीत. परंतु या पराभवानंतरही महापालिका पोटनिवडणुकीत मात्र आघाडीची सरशी पहायला मिळत आहे. महापालिका पोटनिवडणुकीत पद्माराजे उद्यान प्रभागातून (प्रभाग क्रमांक ५५) राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत तर सिद्धार्थ नगर प्रभागातून (प्रभाग क्रमांक २८) काँग्रेसचे जय पटकारे विजयी झाले आहेत.

सिद्धार्थनगर प्रभाग
जय पटकारे (काँग्रेस) यांना १५८०,
नेपोलियन सोनुले (ताराराणी आघाडी) १२०९
सुशिल भांदिगरे (अपक्ष) यांना ८४०
काँगेसचे जय पटकारे ३७१ मतांनी विजय मिळवला.

पद्माराजे प्रभाग
अजित राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस) १७०६
पियुश चव्हाण यांना ६४३
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत यांनी १०६३ मतांनी विजयी