fbpx

कोल्हापूरच्या महापौरांना चंद्रकांत पाटलांच्या बॉडीगार्डकडून धक्काबुक्की

चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा- पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीचं चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी महापौर शोभा बेंद्रेही उपस्थित होत्या. मानाच्या गणपतीचं पूजन झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली, त्याचवेळेस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप बोंद्रे यांनी केला आहे.

‘डीजे’बंदी हटवा, नाहीतर विसर्जन करणार नाही; पुण्यातील गणेशोत्सव मंडळांची भूमिका

नागपूरच्या महापौरांचा प्रताप, मुलाला पीए बनवून नेलं अमेरिकेच्या दौऱ्यावर