‘आता माता-भगिनींनी कंबर कसून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे’ – महापौर आजरेकर

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या बरोबरच नागरिकांना घरातच राहून सहकार्य करावे तसेच रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी, दुकानांमध्ये,भाजी मंडई इ. ठिकाणी गर्दी टाळण्याच आवाहन केलं जात आहे. तसेच सतत ठराविक वेळेने हात साबण लावून स्वच्छ धुण्यासही सांगण्यात आलं आहे.

कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर निलोफर अश्कीन आजरेकर यांनीही कोल्हापूरच्या नागरिकांना पत्रकाद्वारे कोरोनामुळे ओढावलेल्या आपत्तीला धीराने तोंड देण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सर्वांच्या एकजुटीचं महत्व अधोरेखित केलं आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना आणि आदेशाच पालन करावं  असंही त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

घरातील स्त्री ही सर्वात महत्वाची असून, घरातील ‘ती’ या लढ्यात महतवाची भूमिका बजावणार आहे असंही आजरेकर म्हणाल्या आहेत . घरातील कोणालाही विनाकारण बाहेर जाऊ देऊ नये तसेच घरातील सर्वांच्या स्वच्छतेची काळजी घेऊन त्यांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी घरातील महिला महत्वाची भूमिका बजावेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

निलोफर अश्कीन आजरेकर , महापौर ,कोल्हापूर महानगरपालिका यांचं नागरिकांना आवाहन –

 माझ्या समस्त कोल्हापूर वासीय बंधू आणि भगिनींनो,

आज संपूर्ण जगभरात आणि आपल्या देशातही पर्यायाने महाराष्ट्र आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कोरोना व्हायरस सारख्या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, जिल्ह्याचे पालकमंत्री, आणि सर्व शहरांचे महापौर, जिल्हा प्रशासन,महापालिका प्रशासन,वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, आणि सर्व मेडिकल, पॅरा मेडिकल स्टाफ,पोलिस प्रशासन,या जीवघेण्या विषाणूंपासून आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी एक होऊन अहोरात्र लढा देत आहेत.

मी कोल्हापूर शहराची प्रथम नागरिक आणि महापौर म्हणून आपणा सर्वांना मनःपूर्वक आवाहन करू इच्छिते कि, आपण राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरचे संयमी नागरिक आहोत.कोल्हापूर वर ओढवलेल्या आजपर्यंत च्या कोणत्याही आपत्ती ला आपण सर्वांनी धीराने आणि एकजुटीने परतवून लावले आहे.

आज त्याच निकराने आपण एक होऊया,पण आपापल्या घरी थांबून,मनाने आपण एकमेकांना सहकार्य करूया. कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.ही काळजी फक्त या देशातील नागरिकांच्या आरोग्याचे आणि जीविताचे रक्षण करण्यासाठी घेण्यात आली आहे .आपण जर कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलात तर हजारोंच्या संख्येने पुन्हा नवीन रुग्ण तयार व्हायला वेळ लागणार नाही.त्यामुळे आपणाला जिल्हा प्रशासनाने,महानगरपालिका प्रशासनाने आणि पोलिस प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे आपण पालन करावे एवढीच माफक अपेक्षा आहे.

सर्व कुटुंबातील महत्त्वाचा घटक म्हणजे त्या घरची स्त्री असते,आता मला माझ्या माता भगिनी ना कळकळीची विनंती करायची आहे आता आपणच कंबर कसून कोरोना व्हायरस ला प्रतिबंध करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवले पाहिजे. मातांनो आणि भगिनींनो आता यापुढे आपल्या घरातील कोणत्याही सदस्याला आपण घराबाहेर जाऊ देऊ नका, गरज असेल तरच घराबाहेर जाऊन तात्काळ पुन्हा वेळेत परतण्यास आग्रह धरा.मास्क,सैनी टायझरचा वापर अति आवश्यक आहे. काही ठरावीक अंतराने आपले हाथ साबणाने अथवा हँडवॉश ने किमान २० सेकंद धुणे आवश्यक आहे.आपल्या घरांची स्वच्छता तर आपण राखतोच आता आपण आपली काळजी घेऊ मुलाबाळांना या जीवघेण्या व्हायरस पासून लांब ठेवू

घरी थांबा – काळजी घ्या

(निलोफर अश्कीन आजरेकर , महापौर ,कोल्हापूर महानगरपालिका)

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'