मुंबई पुण्यासह कोल्हापुरातील मानाचे बाप्पाही निघाले गावला

टीम महाराष्ट्र देशा : लाडक्या बाप्पाच्या विसर्जणासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. मुंबई – पुण्यासह राज्यात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. पहिला मानाचा गणपती अशी ओळख असणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीचं पूजन करून ही सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक गणेश भक्त जमले असून ढोल ताश्याच्या गजरात बाप्पा घरी जाण्यासाठी निघाले आहेत.

या भव्य मिरवणुकीत कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. तुकाराम माळी तालीम मंडळाने पारंपरिक ढोल पथक आणि पालखीतून मिरवणूक काढली. यावेळी सर्वच मंडळांना शांततेत मिरवणूक काढण्याच आवाहन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान कोल्हापूरला आलेल्या महापुरामुळे काही तालुक्यांमध्ये वातावरण दुखद होते. मात्र गणपती बाप्पाच्या आगमनाने या दुखाचा काहीसा विसर पडला होता. त्यामुळे राज्यातील महापुराचे आलेले संकट दूर व्हावे, दुष्काळ दूर व्हावा, निसर्गाचे चक्र नियमित सुरू राहावे. महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदावी अस मागण पाटील यांनी मागितलं आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्वतः ढोल वाजवून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याचे आवाहन गणेश मंडळांच्या कार्यकत्यांना केले.