तांबड्या आणि पांढऱ्या रस्साचा निकाल लागला, कोल्हापूरच्या मटणाचा वाद मिटला

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापुरात मटन दरवाढीच्या विरोधात नागरीक तर मटन दरवाढीच्या बाजूने व्यापारी यांच्यात गेल्या काहीं दिवसांपासून चांगलेचं रान तापले होते.अखेर आज या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. ४८० रुपये प्रतीकिलो मटन विक्री करण्याची नागरिकांची मागणी खाटिक समाजाने मान्य केली आहे.यात कोणाचे ही आर्थिक नुकसान होणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाला दोन्ही बाजूंकडून आपापल्या बाजू मांडणारी निवेदने देण्यात आली होती. शहरातील पेठ,तालीम मंडळाच्या वतीने मटन दरवादी विरोधात बैठका सुरु होत्या. स्वस्त दराने मटन विक्री करावी यासाठी कारवाई सुरु होती. मटन विक्रेते ५४० रुपये प्रतीकिलो दराच्या खाली येण्यास तयार नव्हते,तर नागरिक ५४० रुपयास मटन खरेदी करण्यास तयार नव्हते.

अखेर या प्रश्नावर तोडगा काढला असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर बैठक होणार आहे.या निर्णय वरून नागरिक आणि व्यापारी आनंदी झाले असून कोल्हापूरकर पुन्हा तांबड्या आणि पांढऱ्या रस्सावर ताव मारताना दिसतील.

महत्वाच्या बातम्या