गृहपाठ न केल्याने विद्यार्थिनीला ५०० उठाबशांची शिक्षा

अभिजित कटके

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक गावात गृहपाठ न केल्याने विद्यार्थिनीला ५०० उठाबशांची शिक्षा दिल्याची घटना घडली आहे. ३०० उठाबशा काढल्यानंतर ही विद्यार्थिनी जागेवरच कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उठबशा काढल्याने विद्यार्थिनीच्या पायाला सूज आली आहे.

याप्रकरणी शिक्षिका अश्विनी देवाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. पीडित मुलगी येथील भावेश्वरी शाळेत इयत्ता आठवीत शिकते. तिने दिलेला गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेने तिला उठाबशांची शिक्षा दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.