कोल्हापुरात ११ लाखांची दारू जप्त

Kolhapur 11 lakh liquor seized

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात ३ ठिकाणी भरारी पथकाने छापा टाकून तब्बल ११ लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ही दारू ३१ डिसेंबरच्या पूर्वतयारीसाठी आणल्याची माहिती त्या तीन आरोपींनी दिली आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली आहे. आप्पा विठोबा भोसले, लक्ष्मण सखोबा गावडे आणि शंकर राणबा दळवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या कारवाईत विविध कंपन्यांची ७५० मिलीच्या २,५४४ दारूच्या बाटल्या, १८० मिलीच्या १४४ बाटल्या अशा एकूण २,६८८ दारूच्या बाटल्या भरारी पथकाने जप्त केल्या आहेत.

भरारी पथकाने दारूंच्या बाटल्यासह आरोपींकडून १६ हजार ८४० रूपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.