कोकण विधानपरिषदेची जागा भाजपकडून नारायण राणेंच्या पक्षाला

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : कोकण विधानपरिषद निवडणुकीत भाजपने नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जागा देऊ केली आहे. तर शिवसेनेने यापूर्वीच राजीव साबळे यांना उमेदवारी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोकण विधानपरिषद निवडणुकीत भाजप राणेंना साथ देते की युतीचा धर्म पाळते हाच प्रश्न आहे.

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांपैकी एखादा सदस्य ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे कोकणात शिवसेना विरुद्ध नारायण राणे विरुद्ध तटकरे अशी तिरंगी लढत रंगणार आहे.