fbpx

शरद पवारांचा नियोजित कोकण दौरा रद्द

शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती स्थिर नसल्यानं त्यांनी आजचा आपला नियोजित कोकण दौरा रद्द केला आहे.ते आज नाणारला भेट देण्यासाठी जाणार होते. राष्ट्रवादीचे राजापूर मतदार संघ प्रमुख अजित यशवंतराव यांच्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांनी दौरा रद्द केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोकणात एका कार्यक्रमानंतर ते स्थानिकांशी संवाद साधणार होते. रिफायनरी प्रकल्पाला विरोध का होतोय, स्थानिकांची नेमकी काय भूमिका काय आहे, हे पवार जाणून घेणार होते. पण प्रकृती अस्वथ असल्याच्या कारणामुळे त्यांना आपला हा नियोजित दौरा रद्द करावा लागला आहे.