नवीन प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत कोहलीची विशेष तयारी 

नवीन प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत कोहलीची विशेष तयारी 

virat kohli

कानपूर : भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरु झाली असून पहिला सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर होत आहे. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane)नेतृत्वाखाली भारताचा (India)न्यूझीलंडविरुद्ध (New-Zealand) पहिला कसोटी सामना होत आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनं कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला आराम करण्याची संधी दिलीय. तर विराट कोहली दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व करणार आहे. आजच्या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरनं कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार विराट (virat kohali) कोहलीने T20 विश्वचषकानंतर काही काळ विश्रांती घेतली आहे. तो न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका आणि पहिल्या कसोटीतून बाहेर आहे. तर मुंबईतील दुसऱ्या कसोटीत तो कर्णधार म्हणून पुनरागमन करेल. दरम्यान, त्याआधी कर्णधार विराट कोहली नवीन प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्याकडून   फलंदाजीचे खास प्रशिक्षण घेताना दिसत आहे. यावेळचे विराटाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या