कोहलीकडेचं राहणार कर्णधारपद; बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण

virat

नवी दिल्ली : आगामी T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची चर्चा सुरु होती. कर्णधार विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार होणार असल्याच्या जोरादार चर्चा रंगल्या होत्या. तसेच कोहलीच्या जागी मुंबईकर रोहित शर्मा भारताचा एकदिवसीय आणि T20 चा कर्णधार होणार असल्याचं देखील बोललं जात होत.

याच चर्चांवर आता बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. क्रिकेटविश्वास रंगत असलेल्या सगळ्या चर्चा खोट्या असून असं काहीही केलं जाणार नाही. विराटच्या कॅप्टन्सीवर बीसीसीआयची कोणतीही बैठक वा चर्चा झालेली नाही. विराटच सगळ्या फॉरमॅटसाठीचा कॅप्टन असेल, असं बीसीसीआयचे खजीनदार अरूण धुमाळ यांनी सांगितलं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराटचा जास्त फॉर्म दिसला नाही. तसेच विराट त्याच्या कॅप्टन्सीमुळे चांगला खेळ दर्शवत नसल्याचे देखील म्हणले जात होते. यावरच बीसीसीआयने स्पष्टीकरण देत संघाचं कर्णधार विराट कोहलीच असणार  असल्याचं स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :