बाहुबली कोहली : विक्रमी द्विशतक ठोकत केले अनेक विक्रम नावावर

पुणे : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात शानदार द्विशतक झळकावलं आहे. तसंच यावेळी विराटने ७ हजार कसोटी धावा देखील पूर्ण केल्या. त्यामुळे सात हा आकडा विराटसाठी लकी ठरला आहे. दुसरीकडे पुणेकर चाहत्यांसाठी मात्र हा दुग्धशर्करा योगच ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने ८१व्या कसोटीमधील १३८ डावात ही कामगिरी केली आहे.

२१ हजार आंतरराष्ट्रीय धावा करताना सर्वात कमी सामने खेळण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता चौथ्या क्रमांकावर आहे. विराटनं या दुहेरी शतकासह महेला जयवर्धने आणि वॉली हेमंड यांची बरोबरी केली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहली तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मात खेळतो आहे. २०१६ सालपासून आतापर्यंत विराट कोहलीचं हे सातवं द्विशतक ठरलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इतर प्रतिस्पर्धी संघातील एकाही फलंदाजाला विराटसारखी कामगिरी करता आलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या