कोहिनूर मिल प्रकरण नेमक आहे तरी काय?

टीम महाराष्ट्र देशा:-कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. कोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि या कोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. याच प्रकरणी राज ठाकरेंची आज चौकशी होणार आहे.

कोहिनूर मिल प्रकरण नेमक आहे तरी काय?

२००३ मध्ये एनमसिटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक ३ च्या जागेचा लिलाव करण्यात आला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या समोर आहे. या जागेचा लिलाव ४२१ कोटी रुपयांना झाला होता.
माजी मुखमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी याच्या कंपनीने ही जागा विकत घेतली होती. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शोरोडकर याची समान भागीदारी होती. कोहिनूर मिलची जागा विकत घेतानी उन्मेष यांनी आयएल अॅड एफएसला ही सोबत घेतल होत. ४२१ कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम आयएल अॅड एफएस कंपनीने भरली होती.

काही वर्षानंतर आयएल अॅड एफएसने आपला ५० टक्के हिस्सा ९० कोटी रुपयांना विकला.गुंतवणूक २२५ कोटींची असून देखील तो हिसा कंपनीने ९० कोटी रुपयांना कोहिनूर सिटीएनएलला विकला आणि त्यांनतर देखील आयएल अॅड एफएस उन्मेष जोशीच्या कंपनीला कर्ज देण्यात आले होते.

उन्मेष जोशीच्या कंपनीला ५०० कोंटीच रुपायचं लोन देण्यात आले होते. ते कंपनीला चुकत कर्ण शक्य नसल्याने त्या ५०० कोटी रुपयाच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅड एफएस कंपनीने निर्णय घेतला साधरण २०११ साली आयएल अॅड एफएस उन्मेष यांच्या कंपनी कडून ५०० कोटीची जागा घेतली मात्र या व्यवहाराबाबतची नोदनी २०१७ साली करण्यात आली.

राज ठाकरे यांची चौकशी का?

राज ठाकरे यांनी २००८ मध्ये कोहिनूर मधून अचानक काढता पाय का घेतला या संदर्भात राज ठाकरेची चौकशी इडी करणार आहे. आयएल अॅड एफएसने आपला ५० टक्के हिस्सा ९० कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक २२५ कोटींची असून देखील तो हिसा कंपनीने ९० कोटी रुपयांना विकला. त्याच वर्षी राज ठाकरे यांनी आपले सर्व शेअर्स विकून आपली मालकी कोहिनूर मधून संपुष्टात आणली . त्यामुळे राज ठाकरें यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.