जाणून घ्या दक्षिणेत भाजपला अच्छे दिन दाखवणाऱ्या येडियुरप्पांचा जीवन प्रवास

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये बी एस येडियुरप्पा म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच येडियुरप्पा हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आले आहे. चाणाक्ष बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, राज्यातील राजकीय परिस्थितीची उत्तम जाण या आपल्या अंगभूत गुणांमुळे त्यांनी एक तांदूळ गिरणीतील कारकूण ते राज्याचा मुख्यमंत्री असा अशक्यप्राय वाटणारा टप्पा गाठला.

कर्नाटकमध्ये आता भाजपची सत्ता आल्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. एक सामान्य कारकून ते मुख्यमंत्री त्यांचा हा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण आणि अनेक खाच खळग्यांनी भरलेला आहे.कर्नाटकातील माड्या जिल्ह्यातील बुकानाकेरे येथे २७ फेब्रुवारी १९४३मध्ये एका लिंगायत परिवारात येडियुरप्पांचा जन्म झाला. लिंगायत मतांचा कर्नाटकच्या राजकारणावर प्रचंड प्रभाव आहे. येडियुरप्पा हे आपल्या विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रीय राहिले आहेत.

bagdure

१९६५ मध्ये सामाजिक कल्याण विभागात प्रथम श्रेणी क्लर्कच्या रूपात येडियुरप्पांनी नोकरीला प्रारंभ केला. पण, काही दिवसांतच नोकरीचा राजीनामा देत ते शिकारीपुराला गेले. तेथे त्यांनी वीरभद्र शास्त्री शंकर तांदूळ गिरणीत काम करण्यास सुरूवात केली. आपल्या महाविद्यालयीन जिवनात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सानिध्यात आले. १९७० मध्ये त्यांनी सामाजिक सेवा करण्यास सुरूवात केली. कालांतराने त्यांना याच परिसराचे कार्यवाहक म्हणून जबाबदारी देण्यात आली.

येडियुरप्पा हे एक असे नेते आहेत, ज्यांच्यामुळे भाजपने दक्षिण भारतात केवळ विजयच नव्हे तर, सत्तासोपनही चढला. पण, विशेष असे की, सत्तेच्या काळात येडियुरप्पा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले. तीन वर्षे सत्ता उपभोगल्यामुळे खाण घोटाळा प्रकरण पुढे आल्यावर येडियुरप्पांना खुर्ची सोडण्यावाचून पर्याय राहिला नाही. मात्र त्यांचा १८३ पासून आतापर्यंत एकदाही पराभव झालेला नहिये. ते आपल्या पारंपरिक मतदार संघ असलेल्या शिकारीपुरा येथून विजयी होतं आलेले आहेत.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच येडियुरप्पा यांनी काही काळ भाजपपासून वेगळं होत आपलं स्वतःच वेगळं बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला मात्र २१०३ नंतर ते पुन्हा भाजपमध्ये आले आणि भाजपने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत विधानसभेची निवडणूक लढवली आणि कानडी जनतेने पुन्हा एकदा येडियुरप्पा यांच्या बाजूने मताचा कौल दिला.

You might also like
Comments
Loading...