टीम महाराष्ट्र देशा: देशात दिवाळी Diwali हा सण मोठ्या आनंदात आणि उत्सवात उद्या 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जाणार आहे. या सणाचा जल्लोष आणि उत्साह देशभर बघायला मिळतो. दिवाळीच्या दिवशी सर्वत्र दिव्यांच्या प्रकाशाने देश उजळून निघतो. सर्व धर्माचे लोक दिवाळी आनंदाने साजरी करतात. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देते, अशी धार्मिक मान्यता आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताबरोबरच महत्त्वाची असते दिवाळी लक्ष्मीपूजनाची सामग्री. म्हणूनच आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या सामग्री बद्दल माहिती सांगणार आहोत.
लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त
या वर्षी 24 आणि 25 रोजी ऑक्टोबर दोन्ही दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्यातल्या अमावस्येलाला दिवाळी साजरी केली जाणार आहे. या वर्षी 25 ऑक्टोबरला प्रदोष काळाच्या आधी अमावस्या तिथी संपत आहे. त्याचबरोबर 24 ऑक्टोबर रोजी प्रदूषकातील अमावस्या तिथी आहे. त्यामुळे यावर्षी 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. कार्तिक अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 07.02 पासून ते 08.23 पर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे.
दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी लागणारी सामग्री
- पूजेसाठी सर्वात महत्त्वाची आहे माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची मूर्ती किंवा फोटो.
- त्यानंतर माता लक्ष्मी साठी लाल रेशमी वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र.
- माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या आसनासाठी लाल कापड.
- पूजा मांडण्यासाठी लाकडी स्टूल, चौरंग किंवा पाट.
- त्यानंतर आपल्या पूजेच्या गरजेनुसार तेलाचे आणि तुपाचे दिवे.
- कलश पूजा करण्यासाठी कलश, फुल, तुळशीची पाने, विड्याची पाने आणि नारळ
- नैवेद्यासाठी मिठाई किंवा फळं
- गणपतीच्या पूजेसाठी दुर्वा
- देवाला स्नान घालण्यासाठी पंचामृत
- देवाची आराधना करण्यासाठी जानवे आणि कापूर
- आरतीचा ताटाबरोबरच, धूप
- आणि बाकी पूजेसाठी गहू, तांदूळ,बत्तशे इत्यादी
महत्वाच्या बातम्या
- Raju Patil । “मनसे भाजपा-शिंदे गटासोबत युती करणार का?”; राजू पाटील म्हणाले…
- Chandrakant Khaire | “उद्धव ठाकरेंचा दौरा फक्त 24 मिनिटांचा” म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना चंद्रकांत खैरेंचे प्रत्युत्तर म्हणाले…
- India vs Pakistan । रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, पाकिस्तान प्रथम फलंदाजी करणार
- Ola Electric Scooter | Ola ची ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच
- Ambadas Danve | “… तर दिवाळीनंतर आम्ही रस्त्यावर उतरणार”, अंबादास दानवेंचा अब्दुल सत्तारांना जाहीर इशारा