Share

Soler Eclipse | सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी काय करावे, जाणून घ्या!

टीम महाराष्ट्र देशा: सूर्यग्रहण Soler Eclipse ही एक नैसर्गिक आणि खगोलशास्त्रीय घटना आहे. पण या घटनेचा मानवी जीवनावर निश्चितच प्रभाव पडतो अशी मान्यता आहे. सूर्यग्रहणाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या खूप महत्त्व आहे. ग्रहणाच्या दरम्यान ग्रहांच्या हालचाली किंवा सूर्य आणि चंद्र मध्ये काही अमुलाग्र बदल होतात. त्याच होणाऱ्या बदलांमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो अशी मान्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने गर्भवती महिलांचा Pregnant women समावेश होतो. पुरातन काळापासून अशी मान्यता आहे की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिलांवर होतो. त्यामुळे त्यांना ग्रहण काळात अधिक काळजी घेण्याची गरज असते. पण सूर्यग्रहणाचा नक्की गर्भवती महिलांना त्रास होतो का? याबद्दल जाणून घेऊया.

सूर्यग्रहण Soler Eclipse सुरू असताना गर्भवती महिलांना त्रास होतो का?

वेगवेगळ्या संस्कृतीक मान्यतानुसार, ग्रहण हे शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे मानले जाते. काही संस्कृतींमध्ये अशी देखील मान्यता आहे की ग्रहण काळात आईला आणि न जन्मलेल्या बाळांना नुकसान सहन करावे लागते. परंतु याबाबत अद्यापही कोणतेही वैज्ञानिक पुरावे सापडले नाहीत. फक्त पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा म्हणून यावर लोकांची श्रद्धा आहे. सूर्याची किरणे गर्भवती महिलावर पडली तर बाळाला हानी पोहोचवू शकते असे देखील अनेक ठिकाणी म्हटले जाते.

पण प्रत्यक्षात प्राचीन काळी लोकांना जन्मदोष इत्यादींचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणे माहीत नव्हती त्यामुळे लोक ग्रहांना दोष देत होते. पण सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगामध्ये त्यामागील कारणे स्पष्ट झालेली आहे. पण तरीही अजून काही लोक या मिथकांवर विश्वास ठेवतात. विज्ञानानुसार, सूर्यग्रहणाच्या कालावधीत गर्भधारणेवर कोणताही परिणाम होत नाही. तरीही तुम्ही खबरदारी घेऊ शकता.

सूर्यग्रहण सुरू असताना गर्भवती महिलांनी काय करावे?

  • सूर्यग्रहण सुरू असताना गरोदर महिलांनी झोपून न जाता जागे राहून मंत्रोच्चार करावा.
  • गर्भवती महिलांवर सूर्यग्रहणामध्ये नकारात्मक परिणाम होतात अशी समजूत आहे. त्यामुळे ग्रहण संपण्यास सुरू होतच गर्भवती महिलांनी स्थान करून घ्यावे.
  • सूर्यग्रहणातील सूर्यकिरणे गरोदर महिलांसाठी हानिकारक आहे अशी मान्यता असल्यामुळे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराच्या खिडकी, पडदे, दारे बंद करून घ्यावे.

सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी पुढील गोष्टी करू नये

  • पुरातन काळापासून अशी मान्यता आहे की सूर्यग्रहण काळात कुणी काही खाऊ नये. यामध्ये प्रामुख्याने गर्भवती महिलेने काही खाऊ नये असे मानले जायचे, त्यामुळे सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काही खाणे टाळावे.
  • ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही काम करू नये त्याचबरोबर अवजड आणि तीक्ष्ण वस्तूंचा वापर टाळावा.
  • सूर्यग्रहणादरम्यान गर्भवती महिलांनी शिळे अन्न खाऊ नये आणि त्याचबरोबर कोणतेही जोखमीचे काम करू नये.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: सूर्यग्रहण Soler Eclipse ही एक नैसर्गिक आणि खगोलशास्त्रीय घटना आहे. पण या घटनेचा मानवी जीवनावर निश्चितच प्रभाव …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now