जाणून घ्या काय आहे पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण ?

crime

उस्मानाबाद : राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याने या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

Loading...

या प्रकरणी, समाजसेवक अण्णा हजारे यांना साक्षीसाठी बोलाविण्यासाठी सीबीआयने कोर्टात अर्ज दिला होता. मात्र या हत्याकांडातील आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी अण्णा हजारे यांची साक्ष आवश्यक नसून कोर्टासमोर त्यांना बोलवून साक्ष घेऊ नये, असा अर्ज देत त्याला विरोध केला होता.

तो अर्ज सेशन कोर्टाने मान्य केल्यानंतर पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या हत्याकांडाची नियमित सुनावणी १४ मे रोजी मुंबई सत्र न्यायालयात होणार आहे. अण्णा हजारे वगळता पवनराजे हत्याकांडात जवळपास इतर सर्व साक्षीदार यांचे जबाब झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईतील कळंबोली येथे २००६ मध्ये पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना जून २००९ मध्ये अटक केली. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने २५  नोव्हेंबर २००९  मध्ये त्यांना जामिनावर मुक्त केले. पवनराजेंचा आपल्या राजकीय भवितव्याला धोका असल्याचे निंबाळकरांना वाटत होते. म्हणून त्यांनीच पवनराजेंच्या हत्येचा कट आखला. त्यासाठी त्यांनी तीस लाखाची सुपारी दिली. असे या आरोपपत्रात म्हटले आहे.

हत्येच्या कटाचे ते प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप पद्मसिंह पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. निंबाळकर यांच्या हत्येसाठी सुपारी देणे आणि कटाची आखणी असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. केंदीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलच्या कोर्टात पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

६ जून २००९ रोजी सीबीआयने यांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ आणि १२० ब नुसार खून-खूनाचा कट रचल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीबीआयने यांच्या कुलाबा येथील घरावर टाकलेल्या छाप्यात पिस्तुल, रिव्हॉल्वर, नऊ रायफली, काडतुसे, ५२ तलवारी आणि ५२ लाख रुपये रोख सापडले. विशेष म्हणजे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांना ‘क्लीन चिट’ दिली होती.

या खटल्यात पद्मसिंह यांच्याबरोबरच लातूरमधील व्यावसायिक सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, पारसमल जैन, माजी उत्पादनशुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी, बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता कैलाश यादव आणि हल्लेखोर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे हे आरोपी आहेत. त्यावेळी अण्णा हजारे यांनाही पद्मसिंह यांच्याकडून धमकी मिळाली होती.Loading…


Loading…

Loading...