लग्नापूर्वी जोडीदाराबद्दल ‘हे’ जाणून घ्या !

लग्न म्हटलं कि, आपण ती व्यक्ती, त्याचे कुटुंबिय, पैसा या गोष्टी पाहण्यात जास्त रस दाखवतो. मात्र, आयुष्यभराची सोबत निभावण्यासाठी, नाते दिर्घकाळ टिकण्यासाठी इतरही काही गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे. अशाच काही गोष्टी आज जाणून घेऊयात…

1) सर्वात प्रथम तुमचा जोडीदार कुणाच्या दबावाखाली येऊन तर लग्नासाठी तयार झाला नाही याची खात्री करा. कारण तुमचा जोडीदार लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे आहे.

2) होणारा जोडीदार जर नोकरीकरत असेल तर व्यवस्थित चौकशी करा. नसेल तर त्याची स्वप्न, इच्छा किंवा आकांशा समजून घ्या.

3) लग्नानंतर तुमचा जोडीदार एकत्र कुटुंबात राहू इच्छितो की स्वतंत्र याबद्दल जाणून घ्या.

4) जोडीदाराच्या आवडी-निवडी जाणून घ्या. त्याची एखादी सवय तुम्हाला बिलकूल न आवडणारी असू शकते. त्यामुळे भविष्यात वाद उद्भवू शकतो.

5) फॅमिली प्लॅनिंगबाबत तुमच्या जोडीदाराचा काय विचार आहे हे जाणून घ्या.