जाणून घ्या ताकाचे हे फायदे

वेब टीम- जेवण करताना पाणी पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस अथवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताक प्यायल्याने त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे होतात.

ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.

ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

ताकाता साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

You might also like
Comments
Loading...