जाणून घ्या… मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही महत्वाचे निर्णय

MANTRALAY mumbai maharashtra

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील काही महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ५ कोटी रुपये प्रत्येक विद्यापीठाला देण्याची महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

१. एकात्मिक बाल विकासासाठी राज्यात २०१८-१९ पासून राष्ट्रीय पोषण मिशनची अंमलबजावणी करण्यास मान्यता. त्यासाठी येणाऱ्या राज्य हिश्श्यास मंजुरी.

२. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खाजगी भागिदारी तत्त्वावर १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार.

३. नागरी सुविधा देण्यासाठी राज्यातील कटक मंडळांना राज्य योजनेमधून निधी वितरित करण्याचा निर्णय.

४. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील विधी विद्यापीठांना प्रशासकीय व शैक्षणिक खर्चासाठी पुढील ५ वर्षांकरीता प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा ठोक निधी.

५. अंब्रेला एकात्मिक बाल विकास सेवा योजनांमधील उपयोजनांना नवीन नावे देण्यासह योजनांमधील बाबींचे सुधारित दर लागू करण्यास मान्यता.

६. शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना सुलभ आणि नियमित गौण खनिजांच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम-२०१३ मध्ये सुधारणा.