जाणून घ्या : पावसाळ्यातील आहार कसा असावा

blank

टीम महाराष्ट्र देशा : या वर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली आहे. उन्हाच्या उष्णतेने त्रस्त झालेल्या जीवाला या पावसाने आल्हाददायक वाटत आहे. पण वातावरणातल्या बदलामुळे आजारांना मात्र मोठ्या प्रमाणात समोरे जावे लागत आहे. खरं तर पावसाळ्यात पचनशक्ती थोडी नाजूक झालेली असते.

यामुळे जेवण करण्यात आणि ते पचविण्यात जठराची मुख्य भूमिका असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद होतो. म्हणूनच या काळात जास्त जेवल्यास ते नीट पचत नाही. म्हणूनच पावसाळ्यात पचनासंदर्भातील आजार होऊ नये यासाठी आहार काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे.

जाणून घ्या पावसाळ्यात कशी घ्याल आहाराची काळजी 

  • जड जेवण टाळावे. हल्के, ताजे आणि पचनास योग्य असाच आहार घ्यावा.
  • संध्याकाळी लवकर जेवावे. त्यामुळे पचन सुलभपणे होते.
  • या काळात पाणी गढूळ असण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छ पाणी आपण पितोय ना याची काळजी घ्यावी.
  • अस्वच्छ पाण्याने अतिसारासह अनेक रोग होऊ शकतात.
  • आंबे नीट धुऊन खावेत.
  • जांभूळ आणि मक्याचे भुट्टे खाणे या काळात चांगले.

महत्वाच्या बातम्या 

राज्य परिवहन महामंडळात महिलाराज, चालक- वाहक म्हणून दिडशे महिलांची नियुक्ती

इंदापूरच्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील माझ्याकडे तिकीट मागत आहेत : महादेव जानकर

गोपीनाथ मुंडेंच्या चेहऱ्याला भुललो – राजू शेट्टी

तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल, व्हॉट्सअॅपवरून दिला होता तलाक