एक चहावाला, ज्याचं उत्पन ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

chaha pune city

पुणे: चहा म्हटल कि अनेकांच्या चेहऱ्यावर तेज येत. तसेच ऑफिस मध्ये काम करतांना झोप आली तर त्यावर चहा रामबाण उपाय ठरतो. पण कधी विचार केला का? चहावाला महिन्याला किती पैसे कमवत असेल. पुण्यात एका चहा विक्रेत्यांचं महिन्याचं उत्त्पन्न ऐकून अनेकांना धक्का बसेल. कारण, हे चहा विक्रेते महिन्याला तब्बल १२ लाख रुपये कमावतात. नवनाथ येवले असे या चहा विक्रेत्यांचं नाव असून, ते पुण्यात येवले टी हाऊस नावाने चहा विकतात.

pune chahawala

पुण्यातील येवले टी हाऊस हे ‘चहाबाज’ लोकांचे आवडते ठिकाण. पुण्यातील निवडक प्रसिद्ध चहा विक्रेत्यांपैकी येवले टी हाऊस एक आहे. येवले टी हाऊसची महिन्याची कमाई १२ लाख रुपये आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

येवले टी हाऊसचे सहमालक नवनाथ येवले म्हणाले, चहा विक्रीचा व्यवसाय भारतीयांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देतो आहे. या व्यवसायातून चांगली कमाई होत असल्याने मी समाधानी आहे. येवले टी हाऊसचा चहा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवायचे आमचे स्वप्न आहे त्यासाठी आम्ही आखणी करत आहोत.Loading…
Loading...