राष्ट्रपती राजवट लागू करणारे कोण आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी? जाणुन घ्या

blank

औरंगाबाद : राज्यात शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे राज्यपालांनी अखेर राष्ट्रपती राजवट लागू केली. राष्ट्रपती राजवट लागू करणारे हे राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमके आहेत तरी कोण हे आपण जाणुन घेऊयात. सर्वच राजकीय पक्ष सरकार बनविण्यासाठी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करीत असतानाच राज्यपालाच्या एकापाठोपाठ एक धक्यांनी सर्व पक्षांना हादरे बसत आहेत. एकीकडे भाजपला राज्यपालांनी जास्त मुदत दिली. पण शिवसेना व राष्ट्रवादीला फक्त चोवीस तासांचीच मुदत दिली अशी भावनाही राजकीय मंडळींची झाली.

भगसिंह कोश्यारी यांचा जन्म १९९२ ला उत्तराखंडच्या कुमॉंऊ क्षेत्रातील अल्मोडा जिल्ह्यातील एका गावात झाला. अल्मोडात शिक्षण घेतल्यानंतर आग्रा येथील विद्यापीठात इंग्रजी साहित्यात त्यांनी आचार्य ही उपाधी प्राप्त केली. राष्ट्रीय सेवा संघातही ते सक्रीय होते. त्यांनी १९७७ ला लागु झालेल्या आणीबाणीलाही विरोध केला होता.

२००० मध्ये नव्याने स्थापन झालेल्या उत्तराखंड राज्यात ते उर्जा सिंचन, कायदा-न्याय मंत्री होते. ३० ऑक्टोबर २००१ ला ते मुख्यमंत्रीही झाले. परंतु १२२ दिवसांतच १ मार्च २००२ ला त्यांना निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेत्याची त्यांनी भुमिका निभावली. २००७ ला भाजपचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना त्यांच्याऐवजी भुवन चंद्र खंडुरी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते.

भगतसिंह कोश्यारी उत्तराखंड विधानसभेत २००२ ते २००७ पर्यंत विरोधी पक्षनेतेही होते. त्यानंतर ते राज्यसभा सदस्यही होते. ३१ ऑगस्ट २०१९ ला ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :