काय आहे ‘टाइम’ मासिकात मोदींच्या विरोधात लेख लिहिणाऱ्या पत्रकाराचे  पाकिस्तानी कनेक्शन ?

टीम महाराष्ट्र देशा : अमेरिकतील जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकानं २० मे रोजीच्या अंकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान दिलं आहे. मात्र, मोदींच्या छायाचित्रासह ‘फूट पाडणारे भारताचे प्रमुख नेते’, असा वादग्रस्त उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.टाइम मासिकाच्या आशियातील आवृत्तीत २०१९मधील लोकसभा निवडणूक आणि गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारनं केलेल्या कामकाजासंदर्भात ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला पुन्हा संधी देईल का?’ या मथळ्याखाली मुख्य लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Loading...

आतिश तासीर या पत्रकारानं लिहिलेल्या या लेखावरून मोदी आणि भाजप सरकारवर विरोधक टीकास्त्र सोडू लागले आहेत. मात्र हा पत्रकार आतिश तासीर आहे तरी कोण असा सवाल वाचकांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे. तर वाचकांच्या माहितीसाठी आम्ही जेव्हा आतिश तासीर याची माहिती गोळा केली तेव्हा प्रथमदर्शनी हे महाशय भारतीय-ब्रिटिश पत्रकार असल्याची माहिती समोर आली.

मात्र जेव्हा डीटेल्समध्ये आम्ही यांची माहिती गोळा केली तेव्हा हे महाशय पत्रकार तवलीन सिंह आणि पाकिस्तानमधील मोठे उद्योगपती जे नंतर पाकिस्तानातील -पंजाबचे गवर्नर होते अश्या सलमान तासीर यांचा मुलगा असल्याचं समोर आले.2007 मध्येसलमान तासीर हे केंद्रीय मंत्री होते. यानंतर ते पंजाब प्रांताचे गवर्नर बनले. २०११ साली सलमान तासीर यांची त्यांच्याच अंगरक्षकाने गोळ्या घालून हत्या केली होती. 1980 मध्ये ब्रिटनमध्ये जन्मलेल्या आतिश तासीर लहानपणी दिल्लीत वाढले आहेत.

अमेरिकेतील मैसाच्युसेट्समधून आतिश ने 2001 मध्ये पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतली आहे.2011 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये लिहलेल्या एका लेखात त्यांनी त्यांचे वडील भारताचा का द्वेष करत होते याबद्दल लिहिले आहे. आता ज्या व्यक्तीचे वडील भारताचा द्वेष करत होते अश्या पत्रकाराने लिहलेल्या लेखाला का महत्व द्यायचं आणि किती महत्व द्यायचं असा सवाल उपस्थीत करत लोकं आतीशच्या या लेखाकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. मात्र राजकारणीमंडळी मात्र याच मुद्द्याचे भांडवल करू लागले आहेत.

‘टाइम’च्या या लेखात १९८४मधील शीख दंगल आणि २००२मधील गुजरात दंगलीचा उल्लेख केला आहे. काँग्रेस नेतृत्वही १९८४मधील दंगल प्रकरणात आरोप मुक्त नाही, मात्र दंगलीपासून ते दूरच राहिले. तर नरेंद्र मोदींनी २००२मधील दंगलीवेळी शांत राहणं पसंत केलं आणि ते एका विशिष्ट गटाच्या बाजूनं असल्याचं सिद्ध केलं, असंही म्हटलं आहे.

२०१४मध्ये लोकांमध्ये संतापाची लाट होती. नरेंद्र मोदींनी आश्वासनं देऊन ती बदलली. त्यांनी नोकरी आणि विकासाच्या गोष्टी केल्या. मात्र आता ही आशा-अपेक्षांची निवडणूक होती यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. मोदींनी आर्थिक चमत्काराची भाषा केली होती. दिलेली आश्वासनं पाळण्यात ते सपशेल अपयशी ठरले. इतकंच नाही तर त्यांनी धार्मिक राष्ट्रवादाचं वातावरण तयार करण्यास मदतच केली, अशी टीका लेखात केली आहेLoading…


Loading…

Loading...