खा. ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला, अज्ञात हल्लेखोर फरार

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार जोरात सुरु आहे. यानिमित्त उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवारांच्या प्रचारासाठी कळंब तालुक्यात नायगाव पाडोळी येथे आले होते. यावेळी सभा सुरु असताना एका तरुणाने त्यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे आले असता. त्यांच्यावर तरुणाने चाकू हल्ला केला आहे. त्या तरुणाने का हल्ला केला याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. हल्ला करून हा तरुण फरार झालेला आहे. दरम्यान, ओमराजे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेचे खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवत त्यांनी मोठा विजय मिळवला होता. तसेच ते आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत.

महत्वाच्या बातम्या