केएल राहुलचा पंजाब किंग्जमधून पायउतार; ‘या’ संघाकडून मिळली मोठी ऑफर 

केएल राहुलचा पंजाब किंग्जमधून पायउतार; ‘या’ संघाकडून मिळली मोठी ऑफर 

kl rahul

मुंबई : IPL 2022 पंजाब किंग्ज (Punjab Kings) चा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आता ही फ्रेंचायझी सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. भारताचा T20 उपकर्णधार केएल राहुलने पंजाब किंग्जमधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुल आता आयपीएलच्या पुढील आवृत्तीत लखनऊ फ्रँचायझीचे नेतृत्व करणार असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ आयपीएल टीमने राहुलसोबत पुढील 3 सीझनसाठी करार केला आहे.

लखनऊ IPL संघ RP संजीव गोएंका ग्रुप (RPSG) ने ऑक्टोबरमध्ये 7090 कोटींच्या विक्रमी किमतीत विकत घेतला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संघाचे प्रवर्तक आणि वरिष्ठ व्यवस्थापनाने राहुलची अनेकदा भेट घेतली आहे आणि भारतीय सलामीवीराने फ्रँचायझीचे नेतृत्व करण्यास सहमती देखील दर्शविली आहे.

BCCI ने जारी केलेल्या नियमांनुसार, नवीन IPL संघांना IPL 2022 मेगा-लिलावापूर्वी 3 खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी असेल. विद्यमान फ्रँचायझींनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतरच नवीन संघ या खेळाडूंची निवड करू शकतात. जुन्या फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या खेळाडूंना अंतिम करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे.

महत्वाच्या बातम्या