fbpx

गंभीर-वेंगसकरांच्या मते विश्वचषकात चौथ्या क्रमांकासाठी ‘हा’ आहे योग्य फलंदाज

टीम महाराष्ट्र देशा- विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार याबद्दलची चर्चा अजुनही सुरुच आहे. भारतीय संघात मधल्या फळीसाठी विजय शंकर तर पर्यायी सलामीवीर म्हणून लोकेश राहुलची निवड करण्यात आली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने लोकेश राहुल चौथ्या क्रमांकासाठी योग्य खेळाडू असल्याचं म्हटलं आहे.

एका खासगी कार्यक्रमात गौतम गंभीरला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीविषयी प्रश्न विचारला. यावर बोलताना गौतम म्हणाला, चौथ्या क्रमांकाच्या जागेवरून भारत सध्या विचित्र अवस्थेत सापडला आहे. प्रदीर्घ काळासाठी भारतीय संघ व्यवस्थापन रायडूला संधी देत राहिली, आणि अचानक त्याला विश्चचषक संघात स्थान नाकारण्यात आले. आता भारताकडे लोकेश राहुल, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांचा पर्याय आहे. या तिघांपैकी एक फलंदाज चौथ्या जागेवर फलंदाजी करेल.

दरम्यान, गंभीरच्या या मताशी माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी यांनी सहमती दर्शविली आहे. आगामी वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्यावी. कारण, परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची त्याची क्षमता असून, त्याचे तंत्रही अफलातून आहे, अशी अपेक्षा दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली. भारतीय संघ आगामी वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीपर्यंत सहज मजल मारेल. त्यानंतर मात्र त्यांचा कस लागेल, असेही वेंगसरकर यांनी सांगितले.