Share

IND vs SA । केएल राहुल पुन्हा एकदा ठरला फ्लॉप, फॅन्सने सोशल मीडियावर केलं ट्रोल

IND vs SA । नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी ३० ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकातील ३० वा सामना पार पडला. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य आफ्रिकन संघाला हरवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १३३ धावांचे आव्हान दिले आहे. या टार्गेटचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला.

शेवटी अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 19.4 षटकांत 5 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलरने नाबाद 59 तर एडन मार्करामने 52 धावा केल्या. मात्र या सामन्यात पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल ही सलामीची जोडी फ्लॉप ठरली. रोहित शर्माने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. पण राहुल तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे.

https://twitter.com/Cricupdatesfast/status/1586681284914388993?s=20&t=onBoitQlYNGKi5UrwnAvCw

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात राहुल अवघ्या 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुलची बॅट चालली नाही, तर चाहत्यांनी ट्विटरवर फलंदाजाला फटकारण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर एका यूजरने रोहित आणि राहुलसाठी लिहिले की, ‘रोहित-राहुल वर्ल्ड कपमध्ये मोठी फसवणूक करत आहेत.’ राहुलच्या फ्लॉपनंतर चाहते आता त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

IND vs SA । नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी ३० ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकातील ३० वा …

पुढे वाचा

Cricket India Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now