Share

KL Rahul & Athiya Shetty | केएल राहुल आणि अथिया शेट्टी ‘या’ दिवशी बांधणार लग्नाची रेशीमगाठ

KL Rahul & Athiya Shetty | टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड सुपरस्टार सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक काळापासून सुरू आहे. यांच्या लग्नाच्या चर्चेला आता कुठेतरी पूर्णविराम लागणार आहे. कारण लवकरच केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्नाची रेशीमगाठ बांधणार आहे. अलीकडेच या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

पिंकविला यांच्या रिपोर्टनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे दोघे 21 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान लग्न बंधनात अडकणार आहे. ही माहिती मिळताच या दोघांचे चाहते यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नामध्ये संगीत, मेहंदी, हळद हे सगळे कार्यक्रम पार पडणार आहे. हे दोघे दक्षिणात्य पद्धतीने लग्न करणार आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील आलिशान  बंगल्यामध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

केएल राहुल आणि अथिया यांच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहे. नुकतेच जेव्हा मीडियाने सुनील शेट्टीला विचारले होते की, या दोघांचे लग्न कधी होणार आहे? तेव्हा तो उत्तरला होता की, या दोघांचे लग्न लवकरच पार पडेल. अशात या दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर झालेली असून 21 ते 23 जानेवारी दरम्यान यांचे लग्न होणार आहे.

अहाण शेट्टीच्या पहिल्या सिनेमाच्या प्रीमियरला केएल राहुल आणि अथिया शेट्टी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर या दोघांचे लग्न 2023 मध्ये होईल असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते. या दोघांच्या लग्नाच्या वेळापत्रकामध्ये आयत्यावेळी काही बदल झाले नाही, तर या नवीन वर्षात आणखी एक क्रिकेटर आणि बॉलीवूड स्टार लग्न बंधनात अडकणार आहे.

महत्वाच्या बातम्या

KL Rahul & Athiya Shetty | टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड सुपरस्टार सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अथिया शेट्टी (Athiya …

पुढे वाचा

Cricket Entertainment

Join WhatsApp

Join Now