मुंबई : बॉलिवूड प्लेबॅक सिंगर ‘केके’ यांचे कोलकाता येथे लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. ‘केक’च्या निधनानंतर त्यांच्या टीमवर सोशल मीडियावरून अनेक टीका होत होत्या. ‘योग्य वेळी योग्य उपचार मिळाले असते तर आज केके आपल्यासोबत असते’, असे देखील बोलले जात होते. याबाबत अनेक पोस्ट देखील व्हायरल होत होत्या. त्यांनतर आता केकेची मुलगी तामरानं याबाबत एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना भावनिक आवाहन केलं आहे.
तामरानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून केकच्या टीम चा जुना फोटो शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, मी या फोटोमधील प्रत्येक व्यक्तीची आभारी आहे कारण यातली प्रत्येक व्यक्ती माझ्या बाबांसोबत कायम होती. माझ्या बाबांचे शो चांगले आणि प्रत्येकाच्या आठवणीत राहतील असे होण्यासाठी यांनी मेहनत घेतली. मी हितेशला सांगितलं की, जेव्हा बाबा गेले तेव्हा मी, आई किंवा नकुल कोणीच त्यांच्यासोबत नव्हतो. त्यांना आणि अखेरचं गुड बाय देखील म्हणू शकलो नाही. पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही नेहमीच त्यांच्या सोबत होता. जेव्हा बाबांनी काम करायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही त्यांना साथ दिली.”
पुढे अजून तिने लिहिले, बाबांचं त्यांच्या टीमधील लोकांवर खूप प्रेम होतं त्यांच्यावर त्यांचा खूप विश्वास असणार. मी ऐकलंय की हितेश आणि शुभम यांच्यावर बरीच टीका करण्यात आली. त्यांना धमक्यांचे फोन आहे, इमेल्स आले. जर आज बाबा असते तर त्यांना कसं वाटलं असतं. तुम्ही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहेत. कृपया त्यांच्या टीमच्या विरोधात अशाप्रकारे नकारात्मकता परसवू नका.” सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<