केकेआरचा ‘हा’ खेळाडू ठरला आरसीबीसाठी व्हिलन!

viart

अबुधाबी : आयपीएल 2021 च्या प्लेऑफ सामन्यात विराटच्या आरसीबीचा कोलकात्याने 4 विकेट्सने पराभव केला. प्रथम नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना आरसीबीचे फलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीसमोर असहाय दिसले  आणि 20 षटकांत 7 गडी बाद 138 धावा केल्या आणि केकेआरला विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य मिळाले.

केकेआरने 19.4 षटकांत 6 विकेटवर 139 धावा करत विजयाचे लक्ष्य गाठले आणि सामना चार गडी राखून जिंकला. या विजयासह, केकेआरने पात्रता 2 मध्ये स्थान मिळवले, तर आरसीबीचा प्रवास या पराभवाने संपला.

ककेअरच्या एका खेळाडूमुळे विराटचं स्वप्न भंगलं

देवदत्त पडिकलने विराट कोहलीसह संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली, पण फर्ग्युसनने त्याला 21 धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली. एस भरतला 9 धावांवर सुनील नरेनने झेलबाद केले. कर्णधार विराट कोहलीने 33 चेंडूत 39 धावा केल्या आणि सुनील नरेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. एबी डिव्हिलियर्सलाही सुनील नरेनने 11 धावांवर बोल्ड केले. मॅक्सवेलला 15 धावांवर सुनील नरेनने बाद केले. शाहबाज अहमद फर्ग्युसनने शिवम मावीला 13 धावांवर बाद केले. ख्रिश्चन 9 धावांवर बाद झाला तर हर्षल पटेल 8 धावांवर नाबाद राहिला.

सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध घातक गोलंदाजी केली आणि 4 षटकांत 21 धावा देऊन चार बळी घेतले. नरेनने विराट कोहली, एस भरत, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सला बाद करत बेंगळुरूची कंबर मोडली. नरेन व्यतिरिक्त लकी फर्ग्युसननेही दोन विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या