जुन्या ट्विटमुळे आयपीएल मधील KKRची टीम संकटात

KKR

मुंबई : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) एक वादग्रस्त ट्विटच्या संदर्भात वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले आहे. रॉबिन्सनवरील या कारवाईनंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. हळू हळू बरीच वादग्रस्त ट्विट करणारे अनेक खेळाडूंची नावे पुढे येत आहेत.

जुन्या ट्विटमुळे इंग्लंड क्रिकेट टीम मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र आता आयपीएलमध्येही याचा फटका बसणार असल्याचं दिसून येत आहे. कोलकाताचा कॅप्टन इयन मॉर्गन आणि हेड कोच ब्रँडन मॅकलम यांचे देखील जुने ट्विट्स व्हायरल झाले आहेत. या दोघांनी भारतीयांना उद्देशून वर्णद्वेषी प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली होती.

इयन मॉर्गन आणि ब्रँडन मॅकलम यांनी भारतीयांच्या इंग्रजीची थट्टा केले होते. या दोघांनी जाणीवपूर्वक सर हा शब्द वापरला होता, तसेच चुकीच्या इंग्रजीमध्ये ट्विट करत भारतीयांची थट्टा केली होती. त्याचे स्क्रीन शॉट्स आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) मॉर्गनची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

मागील महिन्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित केली. यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने कधी आणि कुठे होणार याबद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगु लागल्या होत्या. मात्र २९ मे रोजी बीसीसीआयने बैठक बोलावुन आयपीएल स्पर्धेचे उर्वरीत सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएई येथे आयोजीत करण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या

IMP