केकेआरचा खेळाडू अशोक डिंडा बनला पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचा आमदार

कोलकाता : भारतात सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज फलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाजची धुलाई करतात. त्यावेळी गोलंदाजाला ट्रोल केले जाते. धुलाई झालेल्या गोलंदाजाला ‘डिंडा अकादमी’ चा नवा सदस्य म्हणून ट्रोल केले जाते.

डिंडा अकादमी हे नाव भारताचा माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा मुळे पडले आहे. हा अशोक डिंडा हा नुकत्याचा पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या निवडणूकीत भाजपकडून मोयना मतदार संघातून आमदार म्हणून निवडुण आला आहे. क्रिकेटच्या मैदानावर अपयशी ठरणाऱ्या डिंडाला मात्र राजकारणाच्या रणांगणात चांगलेच यश पदरी पडले आहे. या निवडणूकीत दिंडाने तृणमूल काँग्रेस पक्षाचा उमेदवार संग्राम कुमार डोलाईला पराभूत केले आहे. दिंडाला एकूण १०८१०९ मते मिळाली, तर डोलाईला १०६८४९ मते मिळाली.

आयपीएल स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात पहिलाच सामना केकेआरकडून खेळताना त्याने ३ षटकात ७ धावा देत विराट कोहली आणि वसीम जाफर यांना तंबुत धाडले होते. मात्र ब्रेंडन मॅकलमच्या अर्धशकतामुळे ही कामगीरी झाकोळली गेली. आयपीएलच्या पहिल्या हंगामात डिंडाने १० सामन्यात २८ च्या सरासरीने आणि ६.६६ इकॉनॉमी रेटने ९ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या आधारे त्याची पुढे भारतीय संघातही निवड झाली होती. मात्र आयपीएलमध्ये नंतर तो महागडा गोंलदाज ठरु लागला. त्यामुळे त्याच्याप्रमाणे ज्या गोलंदाजाची धुलाई झाली त्या गोलंदाजाला डिंडा अकादमीचा सदस्य म्हणून हिणवले जाते. या वर्षाच्या सुरुवातीलाच दिंडाने स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

महत्वाच्या बातम्या