मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022) मधून बाहेर पडल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कमिन्स हिपच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकणार आहे आणि त्यानंतर त्याने भावनिक संदेश पाठवला आहे. कोलकाता संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.
पॅट कमिन्सने कोलकाताचे संघाचे घर असे वर्णन केले म्हटले, ”मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी मागच्या वेळी ज्या संघात होतो त्याच संघात असणे खूप छान होते. घरी परत आल्यासारखे वाटले. माझी आणि माझ्या कुटुंबाची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. आयपीएलचे ५-६ आठवडे खूप चांगले गेले. मी संघाला प्रोत्साहन देत राहीन. मला आशा आहे की आम्ही अंतिम फेरीत प्रवेश करू शकू.”
🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟 𝗔𝗡𝗡𝗢𝗨𝗡𝗖𝗘𝗠𝗘𝗡𝗧
Pat Cummins will miss the remainder of #IPL2022 owing to a minor hip injury.
Have a speedy recovery, @patcummins30. We will miss you! 💜💛#AmiKKR pic.twitter.com/ozd8vnBXOw
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 13, 2022
Great to be home #Australia pic.twitter.com/N2IuLCr5P7
— Pat Cummins (@patcummins30) May 15, 2022
आयपीएल २०२२मध्ये कोलकाताच्या प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता खूपच कमी असल्याने कमिन्स मायदेशी परतल्यानंतर रिहॅब प्रक्रियेतून जाईल. ऑस्ट्रेलियाला पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जायचे असून पॅट कमिन्स पूर्णपणे तंदुरुस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाला टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. ऑस्ट्रेलिया सध्या टी-२० चॅम्पियन आहे आणि त्यांच्यासमोर आपला मुकुट राखण्याचे मोठे आव्हान असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com