मुंबईविरुद्ध केकेआर हाय व्होल्टेज सामना; अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ipl

अबू धाबी : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात IPL 2021 चा 34 वा सामना आज संध्याकाळी 7:30 पासून अबू धाबीमध्ये खेळला जाईल. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात दोन्ही संघ आज आपला दुसरा सामना खेळतील. MI ला त्यांच्या पहिल्या सामन्यात CSK च्या हातून 20 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर KKR ने RCB चा एकतर्फी पद्धतीने 9 गडी राखून पराभव केला. आता एमआयचा संघ विजयी ट्रॅकवर परत येण्यासाठी हतबल असेल तर केकेआरला त्यांची विजयी मालिका कायम राखायची आहे.

आयपीएल 2021 च्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. त्याने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने 8 पैकी तीन सामने जिंकले आणि ते आयपीएल 2021 गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत.

आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 28 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 22 सामने मुंबईने जिंकले आहेत तर केकेआर फक्त 6 वेळा जिंकू शकले आहेत. गेल्या 6 हंगामात केकेआरचा संघ मुंबईविरुद्ध फक्त एकदाच विजय मिळवू शकला आहे. दोघांमध्ये खेळलेल्या शेवटच्या 12 सामन्यांपैकी 11 सामने मुंबईच्या खिशात गेले आहेत.

अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये गुरुवारी होणारा सामना शेख जायद स्टेडियमवर दोघांमधील तिसरा सामना असेल. वर्ष २०२० मध्ये, या मैदानावर खेळलेले दोन्ही सामने मुंबई इंडियन्सच्या नावावर होते.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग 11  – रोहित शर्मा (कर्णधार) / अनमोलप्रीत सिंग, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या / सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, एडम मिलने, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य प्लेइंग 11 – शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लोकी फर्ग्युसन, प्रशांत कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या